Hinjawadi : गॅस चोरी प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज तीन येथे गुन्हे शाखा युनिट चारने (Hinjawadi)कारवाई करत अवैधरीत्या गॅस चोरी करणाऱ्या एकास अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी करण्यात आली.

राजेश कांतीलाल वाडेकर (वय 48, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक फौजदार दादाभाऊ पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश वाडेकर (Hinjawadi)याने घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून रिफील पाईपच्या सहाय्याने रिकाम्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस काढला. याबाबत त्याने कोणतीही खबरदारी घेतली नाही.

Mahalunge : साडेसात लाख रुपये किमतीच्या गियर बॉक्सचा पिकप चालकाने केला अपहार

हा प्रकार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत राजेश वाडेकर याला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.