Mahalunge : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून (Mahalunge)सहा जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री साडेआठ वाजता खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.

राहुल नाथा अवारी (वय 27, रा. पाईट, ता. खेड) यांनी याप्रकरणी (Mahalunge)महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी सावंत (रा. पाळू, ता. खेड), अमित हगवणे (रा. तळवडे, ता. खेड), तुषार वाळूंज (रा. तळवडे, ता. खेड), समीर ठोंबरे (रा. शेलू, ता. खेड), महेश कोळेकर (रा. धामणे, ता. मावळ), संकेत कोळेकर (रा. धामणे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२३ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल हे पाईट येथील एच पी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते.

तिथे ते त्यांच्या आतेभावासोबत बोलत थांबले. त्यावेळी इको गाडीतून (एमएच 14/जेएक्स 6427) आरोपी आले. शिवाजी सावंत याने राहुल यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने मारहाण केली. त्यात राहुल यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी राहुल यांच्या आतेभावाला देखील मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.