Chikhali News : चारित्र्याच्या संशयावरून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून, सासरच्या मंडळींना अटक

एमपीसी न्यूज  – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ओढणीने गळा आवळून खून केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.18) सकाळी चिखली येथील जाधववाडी येथे घडला.(Chikhali News) श्वेता प्रवीण जाधव (वय 27, रा. जाधववाडी, चिखली) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

श्वेता यांचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्वेताचे पती प्रवीण काळुराम जाधव, सासरे काळुराम जाधव आणि सासू प्रमिला काळुराम जाधव (तिघे रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Bye-Election : दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्याप्रती प्रेम म्हणून अश्विनी जगताप यांना विजयी करा – पंकजा मुंडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि त्याचे आई वडील हे श्वेता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घरातील इतर कारणांवरून त्यांचा छळ करत. (Chikhali News) शनिवारी सकाळी प्रवीण याने श्वेता यांचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रवीण याने श्वेता यांना मोशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

खासगी रुग्णालयातून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथेही उपचार न झाल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.