Alandi News : आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

एमपीसी न्यूज : आळंदी मध्ये दि.19 फेब्रुवारी रोजी आळंदी ग्रामस्थांनी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली. (दि.19) रात्री साडे बाराच्या सुमारास नगरपालिका (Alandi News) चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळी समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात आला.त्यानंतर तुळापुर येथून शिवज्योत आणण्यात आली.

तद्नंतर पालिका आधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त पालिका चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हिंदवी स्वराज्य रथात मिरवणूक काढण्यात आली.

Chikhali News : चारित्र्याच्या संशयावरून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून, सासरच्या मंडळींना अटक

या मिरवणुकीत आळंदीकर ग्रामस्थांसह पालिका आधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. तसेच श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळासह,ढोल ताशा वाद्याचे सादरीकरण येथे केले. व चऱ्होली खुर्द यांचा ढोल ताशाचा आकर्षक खेळ, मर्दानी प्रात्यक्षिके ,वारकरी दिंडी,रांगोळी,(Alandi News) नगारखाना, मावळे यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.फटाक्यांची यावेळी आतिषबाजी ही करण्यात आली.आळंदी शहरात एक गाव एक शिवजयंती चे समस्त आळंदीकरांनी आयोजन केले होते.पोलीस व वाहतूक पोलिसांचे या कार्यक्रमास  बहुमूल्य सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.