Pune Crime News : शाळकरी मुलीचा विनयभंग; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वर्गात एकटी असताना शिक्षकाने  (Pune Crime News) मुलीशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला.ही घटना चंदननगर भागातील एका शाळेत घडली.

याबाबत एका शाळकरी मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भगवती प्रसाद शर्मा (वय 55, रा. पार्कलेन सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) या शिक्षकाच्या विरुद्ध विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आरोपी शर्मा कार्यानुभव विषयाचा शिक्षक आहे. सोळा वर्षीय मुलगी वर्गात एकटी होती. त्या वेळी शर्मा यांनी मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला.  अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.