Jodhapur : अ. भा‌. छाजेड परिवार संस्थेतील गैरप्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार 

पारस छाजेड यांची डांगीयावास पोलीस ठाण्यात तक्रार

एमपीसी न्यूज – बिरामी येथील देवस्थानमध्ये कार्यरत ( Jodhapur) असलेल्या अखिल भारतीय छाजेड परिवार संस्थेचे स्वयंघोषित पदाधिकारी व कर्मचारी गैरकारभार करीत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. पारस छाजेड यांनी याबाबत डांगीयावास पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पारस छाजेड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. राजस्थान सरकारच्या देवस्थान विभागाने या संस्थेला आर्थिक व्यवहार करण्यास प्रतिबंध केला आहे.

Pune : खबरदार! प्रवाशांची लूट कराल तर; आरटीओची खासगी बस चालकांना तंबी

प्रतिबंध असताना देखील मागील काही दिवसांपूर्वी देवस्थानमधील दानपेट्या परस्पर उघडण्यात आल्या. छाजेड परिवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणाशीही सल्लामसलत केली नाही.

त्यामुळे दानपेट्या परस्पर उघडण्याचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात ( Jodhapur) अडकले आहे. देवस्थानच्या दानपेटीत अनेक भाविकांनी रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तूंचे दान केले होते. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कुठेही वाच्यता केली नसल्याचे आढळते, असे तक्रारीत म्हटले आहे.

देवस्थानमध्ये चार दानपेट्या आहेत. त्यापैकी दोन दानपेट्या ट्रस्टच्या सदस्यांनी कुलूप तोडून वैयक्तिक फायद्यासाठी उघडल्या. देवस्थान परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.

या कामासाठी ट्रस्टकडून अवैध मार्गाने पैसे पुरवला जात आहे. याबाबत अनेकदा पारस छाजेड यांनी आवाज उठवला आहे. बेकायदेशीर निवडणुका घेऊन पदावर बसलेल्या एका सदस्याने अनेकांना दमदाटी देखील केली आहे, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

ट्रस्टची पुन्हा निवडणूक होणे आवश्यक आहे. देवस्थानचे अधिकारी यासाठी दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून फेरनिवडणूक करावी. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील पारस छाजेड यांनी तक्रार अर्जात केली ( Jodhapur)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.