Kalapini Nagpanchami: सर्पमित्रांशी गप्पा आणि पारंपारिक खेळांनी कलापिनीची नागपंचमी साजरी…

एमपीसी न्यूज: यंदाची कलापिनीची नागपंचमी सर्पांविषयी शास्त्रीय माहिती व पारंपरिक खेळ यांची उत्तम सांगड घालून साजरी करण्यात आली. (Kalapini Nagapanchami) यामधे बालभवन, कुमारभवनमधील मुले, त्यांचे पालक व प्रशिक्षिका, महिला मंचाच्या महिला आणि स्वास्थयोगाचे सभासद या सर्वांचा उत्साही सहभाग होता.

 

नागपंचमीच्या निमित्ताने ‘वन्यजीव रक्षक’ संस्थेचे कार्यकर्ते निलेश गराडे, किरण मोकाशी, भास्करमामा माळी, जिगर सोलंकी, योगेश जाधव, गणेश गायकवाड, अनिल यशवंत आंद्रे व तुषार सातकर या सर्व सर्पमित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांची ओळख स्वच्छंदने करून दिली व ‘वन्यजीव रक्षक’ अंतर्गत केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली.

कलापिनी संस्थेचे विश्वस्त डॅा. अनंत परांजपे यांच्या हस्ते सर्व सर्प मित्रांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे संस्थापक श्री. निलेश गराडे व संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल आंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री. जिगर सोलंकी यांनी दृकश्राव्य माध्यमातून सापांविषयी माहिती दिली. (Kalapini Nagpanchami) यामध्ये त्यांनी विषारी व बिनविषारी सांपामधला फरक कसा ओळखावा,आपल्याकडे सापडणाऱ्या विविध जातीच्या सापांचे प्रकार, सापां बद्दलचे समज-गैरसमज याविषयीची माहिती व सर्पदंश झाला असेल तर काय करावे हेही सांगितले. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकाचे त्यांनी निरसन केले. छोट्या मुलांनी पण सर्व माहिती लक्षपूर्वक बघितली आणि ऐकली.

Annabhau Sathe: स्वाभिमानी सुराज्य निर्माण करण्यासाठी समताधिष्ठीत महाराष्ट्राची जडणघडण करावी

 

या शास्त्रीय माहितीनंतर स्वच्छंदने सर्वांचे आभार मानले व सौ. विनया अत्रे यांनी सर्वांना लाह्यांचा प्रसाद वाटला. सौ. ज्योती गोखले, सायली रौंधळ, सौ. अनघा बुरसे, सौ.दिपाली जोशी, सौ. शुभांगी देशपांडे यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभांळली. प्रीती शिंदे यांनी स्वागत केले, संस्थेच्या कार्याध्यक्षा व कुमारभवन प्रमुख सौ.अंजली सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले व संस्थेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.(Kalapini Nagpanchami) जूनमधे सुरू झालेल्या महिला मंचाची माहिती देऊन त्यांनी जस्तीतजास्त माहिलांना त्यामधे सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सौ. लीना परगी यांनी नागपंचमीचे महत्त्व, हा दिवस ‘सण’ म्हणून साजरा करण्याचे कारण इ. माहिती अगदी सोप्या शब्दांत सांगितली. त्यानंतर सर्वांनी कागदी नागांची व सापांची पूजा केली.

 

त्यानंतर सौ. दिप्ती आठवले, सौ. ज्योती गोखले व सौ. वृषाली आपटे यांनी सर्वांचे पारंपरिक खेळ घेतले. फुगडी, एका हाताची फुगडी अशा नेहमीच्या खेळांसोबतच लाडू झिम्मा, (Kalapini Nagpanchami) नाच गं घुमा,या लाह्या कशाच्या, लाटा-लाटा, नाव, गाठोडं, पिंगा, गोफ विणणे, इ. नेहमीच्या माहितीत नसलेले व काहीसे विस्मृतीत गेलेले खेळ खेळून नागपंचमी उत्साहात साजरी झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.