Khadaki : खडकी परीसरात मेट्रोचे काम अंतीम टप्प्यात; वाहतुकीत बदल करत वाहतूक पूर्ववत

एमपीसी न्यूज – खडकी परिसरातील (Khadaki) बोपोडी चौक ते संविधान चौक (चर्च चौक) यादरम्यान शुक्रवारपासून (ता. 1) वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. खडकी परिसरात मेट्रोच्या कामामुळे बोपोडी चौक ते चर्च चौका दरम्यान एकेरी मार्ग केला होता.

Pune : आता रेल्वे स्थानकावर करता येणार ई व्हेईकल चार्ज, पुण्यासह प्रमुख रेल्वे स्थानकावर उभारणार चार्जिंग स्टेशन्स

मेट्रोचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे बोपोडी चौक ते संविधान चौकदरम्यान प्रवास करणाऱ्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

बोपोडी चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना बोपोडी चौकातून सरळ खडकी रेल्वे स्टेशन, सी.एफ.व्ही.डी. फुटबॉल मैदान येथून डावीकडे वळून ऑर्डिनन्स फॅक्टरी रुग्णालयासमोर उजवीकडे वळून संविधान चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.तर खडकी बाजारातून पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी संताजी घोरपडे मार्गावरून सी.एफ.व्ही.डी. चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जाता (Khadaki) येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.