Maharshtra : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 157 रुपयांची कपात

एमपीसी न्यूज – सणासुदीच्या काळात जनतेसाठी ( Maharshtra )  सरकारने आनंदाची बातमी  दिली आहे . सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. सिलिंडरचे दर तब्बल 157 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे.

Khadaki : खडकी परीसरात मेट्रोचे काम अंतीम टप्प्यात; वाहतुकीत बदल करत वाहतूक पूर्ववत

या निर्णयामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दरम्यान, राखी पौर्णिमेच्या एका दिवस आधी म्हणजेच मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 157 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 1522.50 रुपये इतकी झाली आहे. याआधी दिल्लीत गॅस सिलिंडर 1680 रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये आजपासून सिलिंडर 1802.50 रुपयांऐवजी 1636 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, यापूर्वी त्याची मुंबईत किंमत 1649 .50 रुपये होती, जी आता 1482 रुपयांवर ( Maharshtra ) आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.