Khadakwasla : धुलीवंदन व रंगपंचमी दिवशी राबविले जाणार खडकवासला जलाशय रक्षण अभियान

एमपीसी न्यूज – धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी (Khadakwasla) रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे हा गैरप्रकार असून यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होतो, त्‍यामुळेच हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्‍था, खडकवासला ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गेली 20 वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे.

या उपक्रमाच्‍या अंतर्गत खडकवासला धरणाभोवती मानवीसाखळी करून प्रबोधन केले जाते. रंगांमुळे होणारे प्रदूषण, सण-उत्‍सवांमागचा उद्देश, ते साजरे करण्‍याची पद्धत यांविषयी प्रबोधन करण्‍यात येते, अशी माहिती आज (शनिवारी) पुणे पत्रकार संघ येथे आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, ‘जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश’चे उपाध्यक्ष दिलीप मेहता उपस्थित होते.

Pune : आमदार करंडक फुटबॉल स्पर्धेत चेतक एफसी, आर्यन एफसी, दुर्गा एसएची आगेकूच

या मोहिमेत दरवर्षी स्‍थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलीस यांच्‍या वतीने (Khadakwasla) पुष्‍कळ सहकार्य लाभत आहे. या मोहिमेच्‍या अंतर्गत यंदाचे हे 21 वे वर्ष असून 7 मार्च (धुलीवंदन) आणि 12 मार्च (रंगपंचमी) या दोन्‍ही दिवशी प्रबोधनात्‍मक फलक हातात धरून सकाळी 9 पासून सायंकाळी 7 पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करण्‍यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्‍यासाठी 8983335517 या क्रमांकावर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.