Khelratn 2023: चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांना खेलरत्न तर मोहम्मद शमी सह 26 खेळाडू अर्जुन पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – यावर्षीचा क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा आणि मानाचा(Khelratn 2023)खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना देण्यात आला आहे.

तसेच स्टार क्रिकेटर मोहम्मद शमी यांच्यासह 26 खेळाडूंना(Khelratn 2023) अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आज दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रात देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे खेलरत्न पुरस्कार होय. हा पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांना देण्यात आला आहे. तसेच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . तसेच विविध खेळांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी 2023 मध्ये भारतात पार पडलेल्या विश्वचषकात दमदार गोलंदाजी करत भारताला मजबूत अवस्थेत नेऊन ठेवले होते. शमी याने विश्वचषकात सर्वाधिक 24गडी बाद करत बॉलर ऑफ द टूर्नामेंट चा किताब मिळवला होता.
33 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीतून सावरत आहे त्यामुळे साऊथ आफ्रिका झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळता आले नाही. परंतु भारतात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकांमध्ये मोहम्मद शमी खेळण्याच्या शक्यता वर्तविला जात आहेत.

खेल रत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूला रोखराशी 25 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येते तसेच 15 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे अर्जुन पुरस्काराचे स्वरूप आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023

Mumbai : शेवडी ते न्हावाशेवा या सागरी सेतुला राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव द्यावे – अभिजीत बिचुकले

चिराग शेट्टी, सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार 2023

मोहम्मद शमी (क्रिकेट), ओजस प्रवीण देवताले (तिरंदाजी), अदिती गोपीचंद स्वामी( तिरंदाजी ),मुरली श्रीशंकर( अथलेटिक्स), पारुल चौधरी (अथलेटिक्स) मोहम्मद हुसमुद्दीन (बॉक्सिंग) आर वैशाली (बुद्धिबळ) अनुष अग्रवाल (घोडसवारी) दिव्य कृती सिंग (घोडेस्वारी) दीक्षा दागर (गोल्फ), कृष्ण बहादुर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी) पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी) नसरीन (खोखो), पिंकी (लोन बोल), ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर (तिरंदाजी) ईशा सिंह (तिरंदाजी) हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वाश), अयहिका मुखर्जी (टेबल टेनिस) सुनील कुमार (कुस्ती) अंतिम पंगाल (कुस्ती) नाओरेम रोशीबिना देवी (वुशु) शितल देवी (पॅरातिरंदाजी) अजय कुमार रेड्डी (दृष्टिबाधित क्रिकेट) प्राची यादव (पॅराकैनोइंग)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.