Trekking :औद्योगिक क्रीडा असोसिएशनची सिंहगड चढाई स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्रीडा असोसिएशनच्या वतीने(Trekking) ॲटलास कोपकोने आयोजित केलेली सिंहगड चढण्याची 60 वी स्पर्धा अत्यंत आल्हाददायक वातावरणात व उत्साहात पार पडली.

आटकरवाडी पासून सुरू झालेली ही स्पर्धा सिंहगडावर पार्किंगमध्ये विसर्जित झाली.

ॲटलास कोपकोच्या वतीने आयोजित केलेल्या या(Trekking) स्पर्धेत 19 कंपन्यांच्या एकूण 162 खेळाडूंनी सहभाग घेतला. “छत्रपती शिवाजीमहाराज की जय” ही घोषणा देत सर्व खेळाडू अत्यंत उत्साहात या स्पर्धेमध्ये सामील झाले.

या स्पर्धेस पुरुष आणि महिला खेळाडूंचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा विविध वयोगटात ही स्पर्धा पार पडली. गट 18-30, ,31-40, ,41-50,,51-60 अशा वयोगटात महिला व खुला गट अश्या एकूण पाच गटांमध्ये घेण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषक वितरण अमरदीप सिसोदिया (जनरल मॅनेजर,ॲटलास कोपको,ॲटलास कोपको स्पोर्ट्स क्लबचे प्रेसिडेंट),ॲटलास कोपको स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी दयानंद प्रक्षाळे,ॲटलास कोपको युनियनचे सेक्रेटरी गणेश गवारी, वसंत ठोंबरे, नरेंद्र कदम,संदीप काळे यांच्या हस्ते झाले.

या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्वप्निल ब्राह्मणकर यांनी व आभार प्रदर्शन संदीप काळे यांनी केले. पारितोषिक वितरण समयी ॲटलास कोपकोचे वरिष्ठ खेळाडू आर एच शेख,तानाजी कवठेकर,संग्राम जगताप हेही उपस्थित होते. औद्योगिक क्रीडा संघटनेचे हरी देशपांडे,विजय हिंगे,प्रदिप वाघ,अतुल काळोखे ,प्रवीण तांबे उपस्थित होते.सुदर्शन आहेर,रेणुका सुर्वे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदत केली.

Khelratn 2023: चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांना खेलरत्न तर मोहम्मद शमी सह 26 खेळाडू अर्जुन पुरस्काराने सन्मानित
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
गट 18 – 30
1) हनुमंत हिरगुडे, प्रथम क्रमांक-टाटा मोटर्स 2)अंकित गौतम, द्वितीय क्रमांक-टाटा मोटर्स 3)प्रमोद उगले, तृतीय क्रमांक-बजाज ऑटो आकुर्डी
गट 31-40
1) विक्रम खरात, प्रथम क्रमांक -टाटा मोटर्स 2)उमेश पाटील, द्वितीय क्रमांक -टाटा मोटर्स 3)किरण कंक, तृतीय क्रमांक – एसकेएफ
गट 41-50
1) निलेश होले, प्रथम क्रमांक – टाटा मोटर्स 2)उत्तम भोसले, द्वितीय क्रमांक -टाटा मोटर्स 3)संदीप निवगे, तृतीय क्रमांक -टाटा मोटर्स
गट 51-60
1)आनंदा जुनगरे, प्रथम क्रमांक -टाटा मोटर्स 2)विद्याधर राणे, द्वितीय क्रमांक -टाटा मोटर्स 3)गणेश मोरे, तृतीय क्रमांक -बजाज ऑटो आकुर्डी
महिला खुला गट
1) मैथिली येडशीकर, प्रथम क्रमांक टाटा मोटर्स
2)रोहिणी कोडगीर, द्वितीय क्रमांक -टाटा मोटर्स 3)संगीता मोरे, तृतीय क्रमांक – टाटा मोटर्स

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.