Kivale Accident : किवळे येथे होर्डिंग पडून पाच मजुरांचा मृत्यू (Photo Feature)

एमपीसी न्यूज : हल्ली पुण्यात अपघातांच्या घटनेत (Kivale Accident) वाढ होताना दिसून येत आहे. त्यात वातावरण बदलामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. आज अशीच घटना किवळे येथे घडली. वातावरण बदलामुळे बांधकाम साइटवर काम करणारे काही कामगार लवकर सुटले. परंतु, रस्त्यात सोसाट्याचा वारा सुरू झाला. पावसाची शक्यता वाटल्याने, तसेच वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी या मजुरांनी देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या होर्डिंगखाली आसरा घेतला. परंतु, हा आसरा त्यांचा काळ ठरला असून हा होर्डिंग पडून पाच मजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला असून दोन पुरुष आणि एक महिला जखमी आहे.

 


 


 


 




 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.