Nigdi : पोलीस चौकीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाणे अंतर्गत (Nigdi) असलेल्या ओटास्कीम पोलीस चौकीमध्ये एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी निगडी पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना निगडी पोलिसांनी एका 29 वर्षीय संशयित महिलेला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी सुरू असताना तिने पोलीस चौकीतील बाथरूम मध्ये जाऊन लोखंडी ग्रीलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. महिला शौचालयात जात असताना तिच्यासोबत महिला पोलीस कर्मचारी होत्या. महिला पोलीस शौचालयाच्या बाहेर थांबल्या होत्या. बराच वेळ संशयित महिला शौचालयातून बाहेर येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता संशयित महिलेने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

Kivale Accident : किवळे येथे होर्डिंग पडून पाच मजुरांचा मृत्यू (Photo Featured)

काही महिन्यांपूर्वी 14 वर्षीय मुलगी मागील काही महिन्यांपूर्वी तिच्या नातेवाईकांकडे गोवा येथे गेली होती. तिथे तिची मयत 29 वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. गोवा येथे काही दिवस राहिल्यानंतर 14 वर्षीय मुलगी निगडी येथे आली. (Nigdi) दरम्यान 29 वर्षीय महिलेने गोवा येथून थेट पिंपरी-चिंचवडला येऊन 14 वर्षीय मुलीला घेऊन जळगाव गाठले. तिथून दोघी अहमदनगर येथे आल्या. अहमदनगर येथे बालकल्याण समितीच्या सदस्यांना दोघी संशयितरित्या आढळल्या. त्यामुळे बालकल्याण समितीने दोघींबाबत माहिती कोतवाली पोलिसांना दिली.

कोतवाली पोलिसांनी दोघींकडे चौकशी करत निगडी पोलिसांना कळविले. निगडी पोलिसांनी रविवारी (दि. 16) दोघींना पिंपरी चिंचवड येथे आणले. संशयित महिलेकडे निगडी पोलीस चौकशी करीत होते.(Nigdi) त्यादरम्यान तिने पोलीस चौकीतील शौचालयात जाऊन आत्महत्या केली याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.