Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिक शहरातून केली दोन महिलांना अटक

एमपीसी न्यूज – ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाची ( Lalit Patil ) बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी  दोन महिलांना अटक केली आहे. या दोघीही ललित पाटील याच्या मैत्रिणी आहेत.बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून  या दोघींना अटक केली.

Tej Cyclone : अरबी समुद्रात 21 ऑक्टोबरला ‘तेज’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

अधिक माहिती अशी की,  ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या त्याच्या मैत्रिणी  संपर्कात होत्या .त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच  मदत केली, असा पुणे पोलिसांचा संशय आहे. ललित फरार असल्याच्या काळातही या दोघी  सातत्याने त्याच्या संपर्कात होत्या.

ड्रग्जच्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून  या दोघींना अटक केली. आज  पुणे न्यायलायात दोघींना हजर केले जाणार ( Lalit Patil ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.