Mahalunge : पाण्याच्या टँकरमधून 45 लीटर डिझेल चोरीला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पाण्याच्या दोन टँकरमधून 45 लीटर डिझेल चोरण्यात (Mahalunge) आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.29) म्हाळुंगे येथे घडली आहे.

याप्रकऱणी कृष्णा सखाराम पाडाळे (वय 45 रा.म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ताहिर सरोवर खान (वय 30 रा.बाणेर) व विकी विजय खंदारे (वय 19 रा. नवी मुंबई) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन पाण्याच्या टँकरमधून अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून टँकरच्या डिझेल टाकीचे झाकण तोडले.

Pimpri : न सांगता घरी येऊ नको म्हटले म्हणून पती-पत्नीला मारहाण

त्यांनी डिझेल टँकर मधून 4 हजार 250 रुपयांचे 45 लीटर डिझेल चोरून नेताना रंगेहात (Mahalunge) सापडले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.