Mahalunge : शेतात दारुच्या बाटल्या टाकल्याचा जाब विचारला म्हणून शेतकऱ्याला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – शेतात काचेच्या दारूच्या (Mahalunge) रिकाम्या बॉटल का टाकल्या असे शेतकऱ्याने विचारले असता, त्याचा राग येवून तिघांनी लाकूड व कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.19) सकाळी सांगुर्डी खेड येथे घडला आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चेतन सुनिल भसे (वय 22), अनिल लक्ष्मण भसे (वय 46)व अजित हिरामण भसे (वय 30) सर्व रा. सांगुर्डी,खेड या तीनही आरोपींना अटक केली असून चंद्रकांत मारुती भसे (वय 55 रा. सांगुर्डी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosari : विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोयता घेऊन शेतात शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शेतात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या पाहील्या. फिर्यादी यांनी शेतात दारुच्या बाटल्या का टाकता असा जाब आरोपींना विचारला.

याचा राग येवून आरोपींनी तेथे पडलेले लाकूड तसेच फिर्यादीच्या हातातला कोयता हिसकावून घेत शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत (Mahalunge) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.