Mahalunge Crime News : महिलेचा पाठलाग करून घरात घुसु पहाणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – तरुणीचा कार मधून पाठलाग करत  शिवीगाळ करत थेट तिच्या घरात घुसण्याचा (Mahalunge Crime News) एकाने प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार म्हाळुंगे खेड येथे घडला असून महिलेंनी पोलिसांची मदत धेतली असता पोलिसांनी त्याला बेड्य़ा ठोकल्या आहेत. हा सारा प्रकार बुधवारी (दि.15) रात्री उशीरा घडला.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विकास राकेश सरवदे (वय 25 रा.चिखली), राजेश रामदास पाटोळे (वय 28 रा.निगडी),  ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे (वय 36 रा.कृष्णानगर),आकाश मोकींद कांबळे (वय 23 रा. रुपीनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Nigdi News : कराटे काता स्पर्धेत विश्वास स्पोर्ट्स क्लब च्या विध्यार्थाचे घवघवीत यश

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी घरी जात असताना आरोपींनी  फोरव्हिलरमधून त्यांचा पाठवलाग केला. फिर्यादी यांना पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच फिर्यादी घाई-घाईत रुमवर गेल्या व त्यांनी दरवाजा बंद केला. यावेळी आरोपी विकास याने जोरजोरात दरवाजा वाजवत बोलायचे आहे असे सांगितले फिर्यादी यांनी नकार दिला असता त्याने आरडाओरड करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी (Mahalunge Crime News) यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी येवून आरोपींना अटक केली आहे. याचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.