Bawdhan Crime News : हॉटेलच्या दिशेने दगड मारला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलच्या दिशेने दगड का मारला म्हणत हॉटेलच्या कामगारांनी (Bawdhan Crime News) तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.15) मिरो हॉटेल बावधन येथे घडली आहे.

याप्रकरणी प्रथमेश विलास इंगवले (वय 26 रा.बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गरूड (पुर्ण नाव माहिती नाही) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mahalunge Crime News : महिलेचा पाठलाग करून घरात घुसु पहाणाऱ्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम सुतार हे जेवण कऱण्यासाठी गेले असता जेवणापुर्वी सिगारेट ओढण्यासाठी म्हणून थांबले होते. यावेळी शुभम याने हॉटेलच्या दिशेने दगड मारला. यावेळी हॉटेलमधील कामगारांनी फिर्यादीला व मित्राला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली आहे.

यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून नुकसान केले. (Bawdhan Crime News) यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.