Mahalunge Crime News : कंपनीतून जॉब पार्टची चोरी

एमपीसी न्यूज – वसुली फाटा येथील मेगाई पीसी प्रोजेक्टस प्रा ली (Mahalunge Crime News ) कंपनीतून 3 लाख रुपये किमतीचे 30 जॉब पार्टची चोरी झाली.  ही घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली.

ऐनुल हबीब हारुण इनामदार (वय 36, रा. चिंचवड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade News : तळेगाव पोलीस दबावात काम करतात – किशोर आवारे

फिर्यादी इनामदार हे काम करत असलेल्या कंपनीच्या वॉल कंपाउंड वरून दोन चोरटे आत आले. त्यांनी बाथरूमच्या जवळील ग्रीलच्या दरवाजातून कंपनीत प्रवेश केला. स्टेनलेस स्टीलचे सुमारे 1500 किलोचे एकूण 3 लाख रुपयांचे 30 जॉब पार्ट चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.  महाळुंगे एमआयडीसी (Mahalunge Crime News ) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.