Talegaon Dabhade News : तळेगाव पोलीस दबावात काम करतात – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. मात्र अलिकडे एका गंभीर अपघाताच्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळ घालवला. एका एजंटद्वारे या प्रकरणात तोडपाणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याने तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade News)  कोणत्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केला.

तळेगाव दाभाडे येथे 17 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला कारने उडवले. त्यात विशाल देविदास शेलार (वय 32, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यानंतर कार चालक आणि त्याचे साथीदार पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी 22 फेब्रुवारीला रात्री दहानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी अक्षम्य विलंब केला असल्याचा आरोप किशोर आवारे यांनी केला आहे.

Bhosari News :  दुकानासमोरून दुचाकी चोरीला

किशोर आवारे म्हणाले की, तळेगाव येथील उच्चपदस्थ घराण्यातील मुलांनी एका तरुणाला 17 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास दारू पिऊन जोरदार धडक दिली. तसेच त्या तरुणाला रुग्णालयात दाखल न करता रस्त्यावर सोडून सदर तरुणांनी पळ काढला. दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमुळे सदर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कार्यवाही करणे अपेक्षित होते. गुन्हा (Talegaon Dabhade News) दाखल करायचे तर सोडाच परंतु एक एजंट पोलीस ठाण्यात बसून सदर प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्या एजंटवर कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल आवारे यांनी केला आहे.

तो जखमी मुलगा अजून अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. त्यामुळे तळेगावमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाल्याचे आवारे यांनी नमूद केले आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांच्यावर देखील असाच एक गुन्हा काही दिवसांपूर्वी कोणतीही शहानिशा न करता तातडीने दाखल झाला होता. तो पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता, असा आरोप आवारे यांनी केला आहे.

दिलीप डोळस यांना वेगळा न्याय व या भीषण अपघातातील आरोपींना वेगळा न्याय म्हणजेच कायदा व सुव्यवस्था कुणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आक्षेप किशोर आवारे यांनी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.