Bhosari News :  दुकानासमोरून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज –  किराणा दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी ( Bhosari News ) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी गुरुकृपा कॉलनी, भोसरी येथे उघडकीस आली.

 

याप्रकरणी अनिलकुमार भवरलाल शर्मा (वय 42, रा. गुरुकृपा कॉलनी, भोसरी) यांनी  भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Talegaon Dabhade News : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आमदार शेळके यांना निवेदन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांचे किराणा दुकान आहे. त्यांनी त्यांच्या दुकानासमोर मंगळवारी रात्री दहा वाजता 15 हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केली होती. रात्रीच्या वेळी चोरट्याने दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत ( Bhosari News ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.