Talegaon Dabhade News : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आमदार शेळके यांना निवेदन

एमपीसी न्यूज – वारंवार मागणी करूनही मागण्या पूर्ण होत नसल्याने (Talegaon Dabhade News ) राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात मावळ तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांना सुमारे पाचशे अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरू होत असणाऱ्या विधानसभेच्या बजेट अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आमदार (Talegaon Dabhade News ) सुनील शेळके यांनी सांगितले.

Rathani News : रहाटणीत 1 लाख 70 हजारांची रोकड; कमळ चिन्ह असलेल्या मतदार स्लीप सापडल्या

मावळ अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कुटे म्हणाल्या, वेळोवेळी शासनाला सांगूनही आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर राज्यभरातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधणार आहोत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या –

1) अंगणवाडी कर्मचारी या शासनाच्याच सेवक असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा, शासकीय वेतन श्रेणी व अन्य सर्व लाभ लागू करावे.

2) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार ग्रॅज्युएटी देणे.

3) सेवा समाप्ती लाभ रक्कम सेवा समाप्त झालेल्या सेविका रुपये एक लाख व मदतनीस रुपये पंच्याहत्तर हजार मागील चार वर्षांपासून मिळाला नसल्याने तो त्वरित देऊ करावा.

4) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन लागू करावी.

5) कुपोषित बालकांसाठी तीन पट तर सामान्य मुलांसाठी दुप्पट आहार रकमेत तातडीने वाढ करावी.

6) भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या अंगणवाड्यांसाठी मासिक भाडे रुपये साडे सातशे वरून वाढवून सहा हजार रुपयांपर्यंत करावे.

7) ऑनलाईन कामासाठी उच्च प्रतीचा मोबाईल तसेच माहिती भरणा करायचा ‘पोषण ट्रॅकर ॲप’ हा राज्य भाषेत करावा.

https://youtu.be/XCiXcVk_KEE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.