Mahalunge : कंपनीच्या भिंतीचा पत्रा वाकवून साडे तीन लाखांचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज – कंपनीच्या भिंतीचा पत्रा वाकवून रॅकवर ठेवलेले (Mahalunge ) कॉपरचे बंड, पत्र्याच्या पट्ट्या असा एकूण 3 लाख 45 हजार 315 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. हि चोरी सोमवारी (दि.24) पहाटे निघोजे येथील पॉनलटेक कंपनी मध्ये घडली.

याप्रकऱणी वेणु कृष्णन (वय 62 रा.पिंपरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.28) फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती 1008 यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉनलटेक कंपनी मध्ये रॅकवर ठेवलेले 6 वेगवेगळ्या केबलचे बंडल, 10 फूट लांबीच्या 174 किलो वजनाच्या कॉपरच्या पट्या असे एकूण 3 लाख 45 हजार 315 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. यावरून महाळुंगे एमआयडीसीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.