Thergaon : अन् मैत्रिणींसोबतचा तिचा ‘तो’ प्लॅन ठरला अखेरचा

एमपीसी न्यूज : एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात (Thergaon) शिक्षण घेणारी क्रितीका कौर साधू हिने मैत्रिणींसोबत नाश्ता करण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन  बनवला होता. मात्र, क्रितीकाच्या कारला अपघात झाला. ज्यात ती गंभीर जखमी झाली अन तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मैत्रिणीसोबत केलेला तिचा हा शेवटचा प्लॅन ठरला असेच म्हणावे लागेल.

हा अपघात आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावर घडला. यात क्रितीकाची मैत्रीण दिगज्योत धिमन (वय 23) हिच्या मालकिची कार (गाडीचा क्रमांक DL4CAW3642) होती व दिगज्योतच कार चालवत होती. क्रितीका व दिगज्योतसह मानी तोमर (वय 23), लुईस बारीतो (वय 24), दृष्टी ठक्कर, अनुष्का यादव या चार मैत्रिणी ही गाडीमध्ये होत्या.

या साऱ्याजणी डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होत्या. त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे मैत्रिणींनी थेरगाव येथे जाऊन नाश्ता करण्याचा प्लॅन केला. प्लॅननुसार त्या थेरगावच्या दिशेने नाश्ता करण्यासाठी जात होत्या अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली.

परंतु रस्त्यातच गाडीचा अपघात झाला. यावेळी गाडी चालवत असलेल्या (Thergaon) दिगज्योतचे गाडीवरचे नियंत्रण सुटले अन गाडी थेट दुभाजकावर आदळून पलटली झाली. यात साऱ्या मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ थेरगाव येथील रुग्णालायात हलवण्यात आले मात्र क्रितीकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Pune : शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती 1008 यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

या घटनेने महाविद्यालय व या मैत्रिणींच्या इतर मित्र-मैत्रिणीमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे. यात गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी हसत खेळत मैत्रिणींसोबत वेळ घालवणाऱ्या क्रितीकासाठी मात्र हा प्लॅन शेवटचा ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.