Mahalunge : कंपनीचे शेड उचकटून तब्बल साडे दहा लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीचे शेड उचकटून चोरांनी (Mahalunge) तब्बल 10 लाख 79 हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले आहे. ही चोरी 5 ते 14 सप्टेंबर या कालावधीत भांबोली येथील सुनिल रघुनाथ वडके यांच्या मालकीच्या प्लांन्ट मध्ये घडली आहे.
Moshi : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
याप्रकरणी संतोष वसंत पाटील (वय 33 रा. खराबववाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल वडके यांच्या मालकीच्या प्लांटचे शेड उचकटून चोरांनी शेडमधून 1 हजार 79 किलो वजनाचे 10 लाख 79 हजार रुपयांचे कॉपर बार चोरून नेले आहेत. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरांचा शोध घेत (Mahalunge) आहेत.