Mahalunge : कंपनीतून अडीच लाखांचा जनरेटर चोरणाऱ्या दोन कामगारांना अटक

एमपीसी न्यूज- कंपनीतील 40 के व्ही ए हा तब्बल दोन लाख 45 हजार रुपयांचा जनरेटर चोरल्याप्रकरणी (Mahalunge) पोलिसांनी दोन कामगारांना अटक केली आहे. ही घटना फेब्रुवारी 2023 ते 19 जुलै 2023 या कालावधीत महाळुंगे येथील बॉश कंपनीतील वेअर हाऊस मध्ये घडली आहे.

Alandi : आळंदीमध्ये डोळ्यांची लागणमध्ये वाढ; रुग्णांचा आकडा 2800 पार

याप्रकरणी शुक्रवारी (दि.21) धीरज कुमार यदुनंदन सिंग (वय 48 रा तळेगाव दाभाडे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अभिमन्यू अनिरुद्ध बदे (वय 39 रा तळेगाव स्टेशन) व संदिपान सोपान साळवे (वय 37 रा तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वेअर हाऊस मॅनेजमेंट व मॅन पॉवर व इतर अडचणी पाहण्याचे काम करतात. तर आरोपी हे फिर्यादी यांचे कामगार आहेत . कंपनीतील बऱ्याच गोष्टी माहिती असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी बॉश कंपनीतील वेअर हाऊस मधून 40 के व्हीए हे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे जनरेटर  चोरून नेले.

चोरीचा प्रकार उघड झाला असता फिर्यादीने पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. याचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस (Mahalunge) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.