Pimpri : पाणीपट्टीची चक्क 60 कोटींची थकबाकी; पालिका कशी करणार वसूल?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri) एक लाख 75 हजार मिळकतींना अधिकृत नळजोड महापालिकेकडून दिले आहेत. पाणीपट्टी वसुली होताना दिसत नाही. सद्यः स्थितीत 60 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे.

औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सहा लाख दोन हजारांवर एकूण मिळकती आहेत. त्यात निवासी, वाणिज्य, संमिश्र, व्यावसायिक, औद्योगिक आणि मोकळ्या जागा अशा मिळकतींचा समावेश आहे. शिवाय, गृहनिर्माण सोसायट्या, स्वतंत्र घरे, चाळी, झोपडपट्टी अशा निवासी मिळकतींचा समावेश असून, एक लाख 75 हजार मिळकतींसाठी अधिकृत नळजोड महापालिकेने दिले आहेत.

Alandi : आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ ; 2800 वरती रुग्ण

मात्र, पाणीपट्टी वसुली होताना दिसत नाही. त्यामुळे 60 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. शिवाय, 40 हजारांवर अनधिकृत नळजोड (Pimpri) असावेत, असा अंदाज असून सर्व नळजोड अधिकृत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

एकीकडे अनधिकृत नळजोड, पाणी चोरी, पाणी गळती आणि दुसरीकडे अधिकृत नळजोडधारकांकडे वाढणारी पाणीपट्टी थकबाकी व ती वसूल करण्यासाठीची प्रभावी यंत्रणा राबवणे असा पेच प्रशासनासमोर होता. त्यामुळे थकीत पाणीपट्टी वसुलीचे अधिकारी प्रशासक शेखर सिंह यांनी करआकारणी व करसंकलन विभागाकडे सोपविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.