Alandi : आळंदीमध्ये डोळ्यांच्या लागणमध्ये वाढ; रुग्णांचा आकडा 2800 पार

एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ (Alandi) वाढली असून तब्बल 2800 च्यावर रुग्णसंख्या झाली आहे.  त्यासाठी सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रांग लागल्याचे दिसून येत आहे.

Chinchwad : सीएनजी पंपावर रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, पाच जणांवर गुन्हा दाखल

Niv  ची टीम आळंदी मध्ये दाखल झाली असून काही मुलांचे सॅम्पल तपासणी साठी घेतले आहे.आज सकाळ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम(आर बी एस के ची) 15 पथके आळंदी शहरात विविध संस्थेत जाऊन मुलांची डोळ्यांची तपासणी करून जागेवर औषधे देणार आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी आळंदी शहरात घरोघरी जाऊन सर्व्हे करणार आहेत.रुग्ण आढळल्यास योग्य त्या संबंधित सूचना ते देणार आहेत.

याबाबत ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ उर्मिला शिंदे यांनी सांगितले, सोमवारपासून साथीचे रूग्ण रूग्णालयात आले. सोमवारी 450, मंगळवार 740,बुधवार 210 , गुरुवार 160 ,शुक्रवार 1267 एकूण 2827 अशी रुग्णांची आकडेवारी आहे.
तर दि.21 रोजी काल ग्रामीण रुग्णालय ओपीडी —294, ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्र—813, प्राथमिक आरोग्य केंद्र ओपीडी—07, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील केसेस—153 त्यांची एकूण 1267 रुग्णांची आकडेवारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.