Wakad : ट्रस्टी असल्याचे सांगत कुलपतींच्या कार्यालयात घुसखोरी, श्री बालाजी विद्यापीठातील प्रकार

पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ट्रस्टी असल्याची बतावणी करून कोणत्याही परवानगी शिवाय ( Wakad ) कुलपतींच्या कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताथवडे येथील श्री. बालाजी विद्यापिठात गुरुवारी (दि.20) दुपारी घडली.

Pimpri : किरकोळ कारणावरून डोसा सेंटर व्यावसायिकाला ग्राहकाकडून मारहाण

याप्रकरणी  विद्यापिठाचे रजिस्ट्रार डॉ. शिवचंद्र बसप्पा आगासे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परंधामन, जयबालन,शितकल ,सुधाकर (पूर्ण नावे माहिती नाहीत) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परंधामन,जयबालन व महिला हे कार मधून आले. त्यांच्या सोबत कामावरून काढून टाकलेले कर्मचारी शितकल व सुधाकर हे देखील होते. कोणतीही परवानगी नसताना कॉलेजमध्ये घुसत थेट कुलपती  बालसुब्रमण्यम यांच्या ऑफीसचे दार गार्डला उघडायला लावून त्यांनी कार्यालयात प्रवेश केला.

यावेळी विद्यापीठाचे ट्रस्टी असल्याचे त्यांनी गार्डला सांगितले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत ( Wakad ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.