Talegaon Dabhade : संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनकडून हार, तुरे, पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य आणण्याचे (Talegaon Dabhade) आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहर परिसरातील विविध संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य संकलित केले. हे साहित्य नगरपरिषदेच्या थोर समाज सुधारक नथुभाऊ बाबुराव भेगडे पाटील माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले.

Wakad : ट्रस्टी असल्याचे सांगत कुलपतींच्या कार्यालयात घुसखोरी, श्री बालाजी विद्यापीठातील प्रकार

यावेळी संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच तरुण ऐक्य मित्र मंडळ पदाधिकारी आणि असंख्य मित्र परिवारासह, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश आंबेकर, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे, संचालक अमित भसे,समिर भेगडे, धनराज माने, अक्षय रानवडे,अनिकेत वाघोले, राहुल देठे,आदित्य काळे, ऋषिकेश माने,शाळेतील मुख्याध्यापिका वर्षा थोरात,प्रियंका हातेकर,योगिता शिंदे,माधुरी भराटे,मीना सावंत, सुप्रिया वाव्हळ,शंकर तोळे यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

यावेळी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पंढरीनाथ पारगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पारगे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य रूपाने शुभेच्छा दिल्या. याच संकलित झालेल्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, असे अंकुश आंबेकर यांनी सांगितले.

यावेळी पतसंस्था अध्यक्ष राहुल पारगे यांनी अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्यांचे संकलन सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी करुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जोपासण्याचा प्रयत्न करावा. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

आम्ही देखील विद्यार्थिनींनाच या शालेय साहित्याचा वाटप करीत आहे. त्यामुळे निश्चितच आम्हा सर्वांना आनंद होत आहे. शुभेच्छा रुपी आवाहनाला प्रसाद देत सामाजिक संस्था, विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्र परिवार यांचे विशेष आभार मानण्यात आले. संतोष भेगडे नेहमीच विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून 100 टक्के समाजकारण करत असतात हे सांगायला फार आनंद होतो, असेही पारगे (Talegaon Dabhade) म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.