Chinchwad : सीएनजी पंपावर रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सीएनजी पंपावर रांगेत उभ्या असलेल्या रिक्षा चालकांमध्ये (Chinchwad)  बाचाबाची झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.20) रात्री चिंचवड येथील एका सीएनजी पंपावर घडली. याप्रकऱणी चिंचवड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

याप्रकरणी श्रीकांत लालासाहेब जोगदंड (वय 32 रा.चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14,जे पी 5702 चा रिक्षा चालक व त्याचे चार साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेले होते. रिक्षामध्ये सीएनजी भरत असताना आरोपीने लाईनमध्ये घुसून फिर्यादी व इतर रिक्षा चालकांना शिवीगाळ केली.

दमदाटी करत त्यांनी फिर्यादीला लोखंडी बॅरीकेडने मारहाण करत जखमी केले. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध (Chinchwad)  घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.