Pimpri : शहरातील जुन्या जलनि:स्सारण वाहिन्या बदलणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांतील ( Pimpri ) ड्रेनेजलाइन (जलनि:सारण वाहिन्या) जुन्या झाल्याने त्या वारंवार तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. नाले व नद्यांना थेट ड्रेनेजलाइन जोडण्यात आल्याने जलप्रदूषण वाढत आहे. हे रोखण्यासाठी संपूर्ण ड्रेनेजलाइनचे जाळे आणि नैसर्गिक नाल्याचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात झाली आहे. त्या आधारे ड्रेनेजलाइन अद्ययावत करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका सुमारे 300 कोटी खर्च करणार आहे.

Pimpri : किरकोळ कारणावरून डोसा सेंटर व्यावसायिकाला ग्राहकाकडून मारहाण

शहरात नगरपालिकेच्या काळातील सुमारे 35 वर्षांपूर्वीची ड्रेनेजलाइन आहेत. काही भागांत नव्याने ड्रेनेजलाइन टाकली आहे. काही भागांत अद्याप जुन्याच वाहिन्या आहेत. बैठे घरे व चाळी जाऊन आता, मोठ मोठ्या इमारती व हाऊसिंग सोसायट्या तयार झाल्या आहे. लोकवस्ती वाढल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी तयार होते.

मात्र, ड्रेनेजलाइनची क्षमता जुनीच असल्याने त्या तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच, नाले व स्टॉर्मवॉटर लाइनला ड्रेनेजलाइन जोडून सांडपाणी सोडून देण्यात आले आहे. ते सांडपाणी नदीत मिसळून जलप्रदूषण वाढत आहे.

इंदूर शहराच्या धर्तीवर शहरातील सर्व ड्रेनेजलाइन व नाल्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी डीआरए या एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. शहराचे चार भाग करून हे काम केले जात आहे. कॅमेर्‍यांची मदत घेऊन ड्रेनेजलाइन तपासले जात आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व अभियंत्यांचे सहाय्य घेण्यात येत आहे.

सर्वेक्षणाची मुदत वर्षभराची आहे. मात्र, त्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सर्वेक्षणासाठी संबंधित एजन्सीला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दीड टक्के शुल्क दिले जाणार आहे.

शहरात जुन्या, खराब व नादुरुस्त ड्रेनेजलाइन कोणत्या हे समजणार आहे. कोठे सांडपाणी तुंबते व का हे स्पष्ट होणार आहे. कोणत्या भागात ड्रेनेजलाइन थेट स्टॉर्मवॉटर लाइन व नाल्यास जोडण्यात आली आहे. कोणत्या भागात अधिक क्षमतेच्या ड्रेनेजलाइनची गरज आहे, हे समजणार आहे.

ड्रेनेज व नाल्याचा संपूर्ण आराखडा तयार करून तो अहवाल संबंधित एजन्सी पालिकेस सादर करणार ( Pimpri ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.