Maharashtra Assembly News : दिवंगत खासदार गिरीश बापट यांना विधिमंडळात श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (दि. 17) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळात भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात (Maharashtra Assembly News) आली. त्यानंतर सभागृहाची बैठक स्थगित करण्यात आली.

Maharashtra News : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; अधिवेशनात ‘ही’ विधेयके मांडण्यात येणार

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे झाला. त्यांनी बी कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले. बापट हे सन 1983 ते 1997 या कालावधीत पुणे महापालिकेचे सदस्य होते.

सन 1995, सन 1999, सन 2004, सन 2009, सन 2014 असे पाच वेळा कसबा पेठ मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेले होते.

सन 2014 ते 2019 या कालावधीत ते अन्न व नागरी पुरवठा तसेच संसदीय कार्यमंत्री म्हणून काम पाहिले. विधानमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून गेले.

सन 2008 मध्ये राष्ट्रकुल संसदीय समितीकडून त्यांचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पेशवा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, कायाकल्प संस्थेचे अध्यक्ष, नटरंग अकादमीचे संचालक, पुणे जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले.

पुणे येथील संपदा सहकारी बँकेचे ते संचालक होते.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कर्मचारी संघटनेचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी कामकाज केले आहे.

आणीबाणीच्या कालावधीत बापट यांनी 19 महिने कारावास भोगला. बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन (Maharashtra Assembly News) झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.