Pune : महाविकास आघाडीच्या वाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

एमपीसी न्यूज – दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (Pune) पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (उध्दव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र निवडणूक लढविणार आहेत. 2 वेळा काँग्रेसचा पुणे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केली आहे. त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत पुणे लोकसभा हा मतदारसंघ आमचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सुनावले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या पुणे लोकसभा निवडणुकीत नेमका हा मतदारसंघ कोणाला मिळणार, उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता लागली आहे.

Alandi : विद्यार्थी शाळेचे नाव उंचावतील – वेदमूर्ती महेशजी नंदे 

शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेऊन पुण्याचा खासदार ह शिवसेनेचाच असेल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसने विविध कार्यक्रम आयोजित कारून हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड.  अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.