Alandi : विद्यार्थी शाळेचे नाव उंचावतील – वेदमूर्ती महेशजी नंदे

एमपीसी न्यूज – आळंदी  येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर या (Alandi) प्रशालेत  विद्यार्थ्यांच्या विविध सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माऊलींच्या मूर्ती पुजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

 

समारंभाच्या अध्यक्षस्थानी वेदमुर्ती महेशजी नंदे (विश्वस्त महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान)  उपस्थितीत होते, जयकिसन शर्मा (विश्वस्त महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान), लक्ष्मण जोशी (योगाचार्य), भगवान जोशी (अध्यापक), मोरे काका आदी मान्यवारांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, प्राचार्य डी.एम मुंगसे, क्रीडाप्रमुख श्रीरंग पवार, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयश्री मुंजाळ, उपसचिव जितेंद्र इगवे, सदस्या मुक्ता मालुंजकर,  दिव्या भतासे,  सीमा भगत, शैलेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधून प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी मोबाईलच्या आभासी खेळाच्या युगामध्ये मैदानी खेळाचे महत्त्व सांगितले.संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळ खेळण्याची प्रेरणा दिली. प्रशालेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्व समजावून सांगितले.

 

Pune : काल जे बोललो, ते माझे फायनल – अजित पवार

 

लक्ष्मण जोशी (योगाचार्य) यांनी आपल्या मनोगतामध्ये योगासने, मर्दानी खेळाचे महत्त्व समजावून सांगत घरचा पोषक आहार घेत दैनंदिन आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे आव्हान केले. जयकिसन शर्मा (विश्वस्त महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान) यांनी शक्ती असेल तर खेळू शकाल असे मत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष वेदमुर्ती महेशजी नंदे (विश्वस्त महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान) यांनी शालेय परिसर व विद्यार्थीचा उत्साह पाहून शाळेचे नाव उंचावतील असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पोत्यांची शर्यत, अंक शिडी, 100 मी. धावणे, डॉज बॉल, कॅरम, बुद्धिबळ, 200 मी. धावणे इ. विविध खेळांच्या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थितांचे आभार वर्षा काळे यांनी मांनले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशा कांबळे,  वैशाली शेळके यांचे सहकार्य (Alandi)  लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.