Pune : काल जे बोललो, ते माझे फायनल – अजित पवार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा ( Pune) पराभव करणार म्हणजे करणारच, ते मी काल सांगितल ते माझे फायनल असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या शिरुरमधील कार्यक्रमाचा काही संबंध नाही. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लख लाभ, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येणार्‍या हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारले. आज कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर काढण्यात येणाऱ्या मोर्चा बाबत शरद पवार यांच्या सोबत चर्चा झाल्याचे कोल्हे म्हणाले.

Pune : विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण – प्रकाश जावडेकर

अजित पवार यांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना शिरुरमध्ये आगामी लोकसभेत अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार असे आव्हान दिले. त्यानंतर अजित पवारांनी काल पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना चॅलेंज देत, “आता बघा, अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल”, असे म्हटले होते. आज सकाळी पवार यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात येणार्‍या मांजरी येथील उड्डाण पूल आणि अन्य विकास कामांची पाहणी केली.

खासदार अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर, अजित पवार यांची भेट घेऊन आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.