Pune : दत्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – दत्त जयंतीचे औचित्य साधून पुणे जिल्हा (Pune) सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी  संघामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले होते. कात्रज डेअरीने भारती हॉस्पिटलच्या सहकायनि मोफत रक्तदान शिविर आयोजित केले होते. या शिबिरात संघातील सेवक, अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 63 बाॅटल्स रक्त संकलीत झाले.

Pune : महाविकास आघाडीच्या वाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

या रक्तदान शिविराचे उदघाटन संघाचे चेअरमन भगवान  पासलकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे संचालक भिंगारे, लताताई गोपाळे, संघाचे सेवक, अधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात भारती हॉस्पिटल ब्लड बँकेचे शशिकांत जाधव, मानसिंग चव्हाण व त्यांचा स्टाफ यांचा मोलाचा वाटा आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे कात्रज दूध परिवारा तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी (Pune) दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.