Maharashtra : पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी ( Maharashtra) समुद्रावर आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली, सातारा, सोलापूर,पुणे, बीड, नगर, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.

Lonavala : प्रा. मल्हारी नागटिळक यांना पुणे विद्यापीठाकडून रसायनशास्त्रात पी.एचडी. प्रदान

शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहून, हलक्या पावसाची ( Maharashtra)  शक्यता आहे. रविवार,12 नोव्हेंबरपासून हवामान कोरडे होऊन किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सायंकाळी ढग दाटून येताता व हलकासा पाऊस असे काहीसे चित्र गेले दोन दिवस शहरात पहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हवामान ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तर कोकण व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.रविवारनंतर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कमी होऊन राज्यभरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात धुके पडण्याची शक्यता ( Maharashtra)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.