Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी मनीषा समर्थ

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी मनीषा समर्थ यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून अनंदिता मुखर्जी यांच्याकडे पदभार देण्यात आला.

मावळत्या अध्यक्षा संगीता देशपांडे यांनी मनीषा समर्थ यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. नवीन कार्यकारणीमध्ये वैशाली शहा, सुप्रभा आलोणी, नीतू रोशा, मंजू शर्मा, शालिनी चोप्रा, अनुराधा सूद, हंसा मोहन, बेला अगरवाल, विनिता अरोरा, प्रतिभा कुलकर्णी, वैशाली जैन यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लब 313 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रेणू गुप्ता उपस्थित होत्या. कार्यक्रमात क्लबच्या ‘पहचान’ पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

रेणू गुप्ता म्हणाल्या, “गतवर्षीच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी चांगले काम केले. त्यामुळे क्लबला नवी उंची मिळाली आहे. नवीन कार्यकारणी मधील सर्व सदस्या देखील जोमाने काम करतील. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच उद्देशातून क्लबमधील प्रत्येक सदस्याने काम करायला हवे. शिक्षण, ग्रामीण विकास, पर्यावरण, महिला सुरक्षा यांसारख्या विविध विषयांवर अजून काम करण्यासारखे आहे” विविध उपक्रमांची माहिती देत आपापली क्षेत्रे निवडून कामाला लागण्याचा सल्ला देखील रेणू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला.

मनीषा समर्थ म्हणाल्या, “शिक्षण, आर्थिक सधनता, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा आणि पर्यावरण याविषयी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. काही उपक्रमांवर सध्या काम सुरू झाले आहे. नागरिकांच्या सहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात येणार आहेत”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता अरोरा आणि अनघा रत्नपारखी यांनी केले. आभार प्रतिभा कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.