Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना रेनकोट, शालोपयोगी साहित्य

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील बोरगाव येथील आदिवासी पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्या-येण्यासाठी 100 रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच 700 वह्यांसह इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. रेनकोट आणि वह्या मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद ओसांडून वाहत होता.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील बोरगावात न्यू इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत आदिवासी पाड्यावरील मुले शिक्षण घेतात. रोटरी क्लबतर्फे बुधवारी (दि.11)शाळेत जाऊन या विद्यार्थ्यांना 100 रेनकोट, 700 वह्यांसह शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, सचिव महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडकर, सचिव सुभाष गारगोटे, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस शिशुपाल, विक्रम घुले, किशोर गोरे आदी उपस्थित होते.

रोटरीचे अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले, ”जनता शिक्षण संस्थेतेमार्फेत आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी ही न्यू इंग्लिश स्कूल शाळा चालविली जात आहे, हे कौतुकास्पद आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. शिक्षणापासून मुले वंचित राहत नाहीत. याची दक्षता घेतली जात आहे. शाळेच्या दर्जा अतिशय उत्तम असून गतवर्षी दहावीच्या निकाल 100 टक्के लागला आहे, ही आनंदाची बाब आहे”

”शाळेमध्ये 113 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये शाळेत येण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे रोटरी क्लबतर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाची अधिक गोडी लागावी, लेखनाची सवय वाढावी यासाठी 700 वह्यांचे वाटप करण्यात आले असून याबरोबरच इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.