Wakad : लग्नात मानपान न दिल्याच्या रागातून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मुलीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांना लग्नात मानपान दिला नाही. या कारणावरून पती, सासू, सासरे आणि दीर यांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार गजानन नगर रहाटणी येथे घडला. यावरून विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पूनम महावीर वाळके (वय 27, रा सहकार कॉलनी नंबर एक, ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती महावीर रामदास वाळके (वय 28), सीमाबाई रामदास वाळके (वय 45), रामदास सीताराम वाळके (वय 55), हनुमंत रामदास वाळके (वय 26, सर्व रा. गजानन नगर, रहाटणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि महावीर यांचे मागील तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. परंतु लग्नामध्ये पूनम यांच्या आई-वडिलांनी महावीर याच्या आई-वडिलांना मानपान दिला नाही, तसेच पूनम यांना घरामध्ये काम करता येत नाही. त्यात त्यांना दोन मुली झाल्या या कारणावरून सासरची मंडळी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. तसेच त्यांना क्रूरतेची वागणूक दिली, यावरून पूनम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.