Pune : पोलीस आयुक्तांना निलंबित करा; विखे पाटलांची मागणी

एमपीसी न्यूज – पानसरे दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतो आहे. त्यावर सरकारला काहीही बोलण्याची गरज वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. माओवादी म्हणून कार्यकर्त्यांना अटक केली जाते त्यावर पोलीस मात्र सरकारचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतात. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या वरिष्ठांना त्वरित निलंबित करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला काेल्हापूरपासून सुरुवात झाली असून अाज पुण्यात ही जनसंघर्ष यात्रा येऊन पाेहोचली अाहे. यावेळी विखे पाटील पत्रकारांशी बाेलत हाेते.

सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने ही सरकार पोलीस यांना फटकारले आहे. खरे तर त्यांची या प्रकरणात लाजच गेली आहे. मुख्यमंत्री काही राजीनामा वगैरे देणार नाहीतच पण किमान त्यांनी व पोलीस आयुक्तांनी राज्यातील जनतेची माफी तरी मागावी, असे देखील विखे पाटील म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.