Maval News : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा गृहप्रवेश

एमपीसी न्यूज – जांभूळ सांगवी ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला.रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या नऊ कुटुंबांचा नव्या घरात गृहप्रवेश करत त्यांना आठ अ उतारा देण्यात (Maval News) आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे नागरीकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानून नव्या घरात प्रवेश केला.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जांभूळ सांगवी ग्रामपंचायतच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना 9 घरे काम पुर्ण झाल्यामुळे गृहप्रवेश व  8 अ चा उतारा वाटप करण्यात आले व पंतप्रधान  घरकुल आवास योजना 1 घर पाया भूमि पूजन यांचे लोकार्पण  सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

त्यासाठी प्रमुख उपस्थिती सुधीर भागवत (गट विकास अधिकारी पंचायत समिती मावळ),संताजी जाधव ( कृषी अधिकारी पंचायत समिती मावळ),शुभांगी भूमकर  (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विस्तार अधिकारी पं. स. मावळ), प्रीती पारसकर  (अधीक्षक मावळ पंचायत समिती) तसेच जांभूळ गावचे लोक नियुक्त आदर्श सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे व  माजी सरपंच संतोष जांभुळकर,ग्रा.पं. सदस्य अमित ओव्हाळ,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या कुंदा खांदवे  विद्यमान सदस्य कल्पना काकरे, तृप्ती जांभुळकर, स्नेहल ओव्हाळ, रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर व ग्रामसेवक कल्याणी लोखंडे आदी उपस्थित होते.
रमाई आवास घरकुल योजना व पंतप्रधान घरकुल आवास योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना घर मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त करून पंचायत समिती मावळ व सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी सतत पाठपुरावा करून आम्हाला घरकुल मिळवून दिल्याबद्दल आभार मानले  तसेच जांभूळ, सांगवी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने (Maval News) उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.