Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Crime News) कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन1999(मोक्का) अंतर्गत आज 8 डिसेंबर 2022 रोजी कारवाई करण्यात आली आहे.

Chakan News : जेवणात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून हॉटेल चालकाने केला आचाऱ्याचा खून, दीड महिन्यानंतर गुन्हा उघडकीस

टोळी पमुख- सत्यम उर्फ पप्पू कड, वय 22 वर्षे, रा. बापदेव वस्ती, कडाची वाडी, चाकण, ता. खेड, जिल्हा पुणे व इतर दोन जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख- कुणाल उर्फ बाबा ठाकूर, वय 22 वर्षे, रा. भुजबळ हॉलच्या समोर, गणपती चौक, तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि पुणे व इतर 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख- करणसिंग दुधाणी, वय 25 वर्षे, रा. अंधशाळेच्या पाठीमागे, रामटेकडी हडपसर पुणे व इतर एक यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.