Pimple-Saudagar News : पिंपळे-सौदागर येथील रेनबो प्लाझा मॉलमधील दुकानाला आग, 18 जणांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर मधील शिवार चौकाजवळ (Pimple-Saudagar News) असलेल्या रेनबो प्लाझा या बहुमजली मॉलमधील एका दुकानाला अचानक आग लागली. यामुळे काही काळ येथे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आग पाहताच नागरिकांची पळापळ झाली. या आगीतून अग्निशमन विभागाने 18 नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे.

Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपळे सौदागर येथील रेनबो प्लाझाला लागलेल्या आगीतून अग्निशमन विभागाने 18 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अशी माहिती  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली आहे. शिवार चौकातील नाशिक फाटा-वाकड बीआरटी रोडच्या कडेला असणाऱ्या रेनबो प्लाझा या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका दुकानाला अंदाजे 4.30 वा च्या सुमारास आग लागली होती. या इमारती समोर तंबू खाली छोटी व्यवसायिकांची दुकाने आहेत. आग लागल्यानंतर या दुकानांच्या मालकांनी तात्काळ दुकानातील साहित्य बाहेर काढण्यास सुरूवात केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

चव्हाण म्हणाले, की रेनबो प्लाझा या इमारतीत बेसमेंट, तळ मजला अधिक 5 मजले आहेत. ब्रेन्टो गाडीच्या  45 मीटर लांब शिडीच्या मदतीने 5 ते 6 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन कर्मचारी जिन्याने इमारतीत गेले व लोकांना बाहेर येण्यासाठी आवाहन केले.(Pimple-Saudgar News) काही नागरिकांनी धूर जास्त येत असल्याने स्वतःला कोंडून घेतले होते. बंद दरवाजाच्या बाहेरून कर्मचारी त्यांना बाहेर येण्यास सांगत होते पण काहीच प्रतिसाद येत नसल्याने दरवाजे तोडून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे 7 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. एकूण 60 अग्निशमन कर्मचारी बचाव कार्य करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.