Chakan News : भरधाव बसच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

एमपीसी न्यूज : चाकण आंबेठाण रस्त्यावर सकाळी भरधाव बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान (Chakan News) सायंकाळी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कामगार वाहतूक करणाऱ्या बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राणी रत्नदीप इंगळे ( वय 19, रा. दावडमळा , चाकण ) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ही विद्यार्थिनी दुचाकीवरून जात असताना चाकण आंबेठाण रस्त्याने भरधाव वेगात आलेल्या मैत्रेय ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस चालकाने दावडमळा फाटा भागात दुचाकीला (Chakan News) जबरदस्त ठोकर दिली. भरधाव बस चालकाने सुमारे अर्धा किमी अंतर दुचाकी ओढत नेली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तत्काळ चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या विद्यार्थिनीचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimple-Saudagar News : पिंपळे-सौदागर येथील रेनबो प्लाझा मॉलमधील दुकानाला आग

दरम्यान चाकण आंबेठाण रस्त्याचे नुतनीकरण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. गंभीर आणि प्राणघातक अपघातांची शृंखला सुरु झाली आहे. (Chakan News) अनेक निरपराध अपघातात ठार झाल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत. तातडीने या बाबत उपाययोजना करण्याची मागणी या रस्त्याच्या लगतच्या नागरिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.