Chakan : जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून लोखंडी रॉडने हॉटेल चालकाला मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज –  जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून  हॉटेल चालकास  लोखंडी रॉडने मारहाण (Chakan)  करण्यात आली आहे, ही घटना चाकण येथील आनंद ढाब्याजवळ रविवारी (दि.21) घडली आहे.

परवेज मुल्तान शेख (वय 34 रा.चाकण) याला अटक केली असून पियूष धाडगे,व त्यांचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रचित महेंद्र धुमाळ (वय 22 रा.आंबेगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SSC HSC News : दुष्काळी तालुक्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना तू परवेज शेख याला जेवणाचे पार्सल का दिले नाही म्हणत आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करत जखमी केले आहे.,चाकण पोिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Chakan)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.