Chakan News : जेवणात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून हॉटेल चालकाने केला आचाऱ्याचा खून, दीड महिन्यानंतर गुन्हा उघडकीस

एमपीसी न्यूज : जेवणात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून हॉटेल चालकाने आचाऱ्याचा दीड महिन्यापूर्वी केलेल्या खुनाचा गुन्हा, गुन्हे शाखा 3 व शस्त्र विरोधी पथक (Chakan News) पिंपरी-चिंचवड यांच्याकडून उघडकीस आणण्यात आला आहे.

याप्रकरणी ढाबाचालक ओंकार केंद्रे वय 21 वर्षे रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापूर रोड, शेल पिंपळगाव, ता. खेड, जि पुणे व त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे व 19 वर्षे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पद्माकर घनवट, सहाय्य्क पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार ढाबा चाकण शिक्रापूर रोड येथे ढाबा चालकाने एक महिन्यापूर्वी एका परराज्यातील कामगाराचा खून  केला असून त्याने त्याचा मृतदेहाची ही विल्हेवाट लावली.

त्या बातमीच्या अनुषंगाने  स्वप्ना गोरे पोलीस उप आयुक्त गुन्हे, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बातमी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, (Chakan News) पिंपरी-चिंचवड यांना कळविण्यात आली. याबाबतीत तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांना आदेश देण्यात आले होते.

Pune News : लम्पी रोखण्यात पुणे जिल्ह्याला यश

त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गिरीश चांगले व अंमलदार यांनी वेशांतर करून ओंकार ढाबा येथे जाऊन तेथील ढाबा चालक व कामगारांची माहिती काढून त्यांच्या फोटो प्राप्त केले. या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आज रोजी बातमीदाराकडून खात्री केल्यावर शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख यांनी या प्रकरणातील संशयितांना तब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले.

त्यानुसार देशमुख व त्यांचे पथक तसेच गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक चामले व पथक यांनी शेल पिंपळगाव येथून संशयित आरोपी ढाबाचालक ओंकार केंद्रे वय 21 वर्षे व त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे व 19 वर्षे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हा उघजकीस आणला आहे.

तपासात निष्पन्न झाले की या दोघा भावांनी मिळून त्यांच्या ढाब्यावर सात दिवसांपूर्वीच आचारी म्हणून काम करण्यासाठी आलेला इसम प्रोसेंजीत गोराई, वय 35 वर्षे, रा. जि. 24 परगणा, राज्य पश्चिम बंगाल याला त्यांच्या जीवनात मी डिझास्टर झाल्याच्या कारणावरून झालेल्या वाद विवादातून 26 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रीच्या दरम्यान ओंकार ढाबा, चाकण शिक्रापूर रोड, शेल पिंपळगाव, ता. खेड, जि पुणे येथे त्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकून लाकडी दांडके, लोखंडी रोड व वायरने मारहाण करून जिवे ठार मारले होते.

त्याचा मृतदेह दिवसभर ढाब्यावरील आतल्या खोलीत लपून ठेवला होता. 28 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटेच्या दरम्यान त्याचा मृतदेह वैष्णवी ढाबा शेल पिंपळगाव, ता. खेड, जि पुणे च्यामागे असलेल्या डोंगराळ भागातील एका ओढ्यात फेकून  त्याची विल्हेवाट लावली होती.

हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणून दोन्ही आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहे. हा खून आरोपींनी त्यांच्या ढाब्यावर (Chakan News) कामास असलेल्या अन्य तीन पर राज्यातील कामगारापुढेच केला होता. आरोपींनी त्यांना सुद्धा जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांनी तो प्रकार कोणालाही सांगितला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.