Pune News : लम्पी रोखण्यात पुणे जिल्ह्याला यश

एमपीसी न्यूज : प्राण्यांना होणा-या लम्पी विषाणूचा संसर्ग राज्यभरात कमी होत आहे. त्यात लम्पी रोखण्यात पुणे अव्वल ठरले आहे. मृत्युमुखी झालेल्या पशुंपैकी (Pune News) सर्वांत कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात केवळ 633 तर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक 4510 पशुंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला लम्पी रोखण्यात यश आले आहे.

लम्पी आजार पसरण्याला सुरुवात होताच पुणे जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला होता. पुणे जिल्ह्यात तातडीने केलेल्या लसीकरणामुळे पशुंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आल्यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर कमी आहे. राज्यात अनेक शहरांत लसीकरणावर भर दिला नव्हता त्यामुळे लम्पीमुळे मृत्यू झाले.

Pune news : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 14 ते 18 डिसेंबरला पुण्यात होणार

लसीकरण करा, असे आवाहन करण्यात येत होते. योग्य उपाययोजनादेखील करणे गरजेचे होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्याने पुणे जिल्हा जनावरांचा मृत्यू रोखू शकला.

राज्यात 35 जिल्ह्यांमध्ये तीन लाख 54 हजार 247 पशुंना संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोन लाख 71 हजार 465 पशु उपचाराने बरे झाले आहेत; मात्र 24 हजार 767 पशुंचा मृत्यू झाला आहे.(Pune News) नुकसानभरपाईपोटी जनावरांच्या मालकांना 29 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.